वृत्तसंस्था / लखनौ
कझाकस्तानमध्ये 9 ते 18 एप्रिल दरम्यान होणाऱया आशियाई ऑलिंपिक पात्र फेरी तसेच 2021 च्या वरिष्ठांच्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती फेडरेशनने पाच महिला मल्लांची निवड केली आहे.
या दोन्ही स्पर्धांसाठी हरियाणाची सोनम मलिक, सीमा, अंशू मलिक, निशा आणि पूजा यांची निवड करण्यात आली आहे. सीमा 50 किलो, अंशू मलिक 57 किलो, निशा 68 किलो आणि पूजा 76 किलो गटात भारताचे प्रतिनिधीत्व करतील. आगामी आशियाई ऑलिंपिक पात्र फेरीच्या स्पर्धेसाठी पुरुषांच्या कुस्ती संघात संदीप सिंग मान (74), सत्यवर्त कादियन (97 किलो), सुमित मलिक (125 किलो) यांची निवड करण्यात आली. ग्रीको रोमन पद्धतीच्या पुरूष विभागात भारताच्या ग्यानेंद्र, आशु, गुरप्रित सिंग, सुनील कुमार, रवि, नवीन यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व मल्लांनी विविध वजनगटातील आपल्या लढती चाचणीत स्पर्धेत जिंकल्या आहेत.