वृत्तसंस्था/ कतार
2019 सालातील आशियाई चॅम्पियन्स लिगमधील सिंगल लेगमधील अंतिम स्पर्धेचे यजमानपद कतारकडे सोपविण्यात आले आहे. सदर स्पर्धा दोहामध्ये 19 डिसेंबरपासून खेळविली जाणार असल्याची माहिती आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली.
कोरोना महामारीमुळे आशियाई चॅम्पियन्स लिग फुटबॉल स्पर्धा गेल्या मार्च महिन्यात तहकूब करण्यात आली होती. क्लबस्तरीय होणाऱया या स्पर्धेतील पश्चिम विभागातील सामने कतारमध्ये घेण्याचा निर्णय गेल्या महिन्यात जाहीर करण्यात आला. या स्पर्धेतील पूर्वविभागातील सामने मलेशियात रद्द करण्यात आले असून ते आता कतारमध्ये घेण्यात येतील. पूर्वविभागीय सामने दोहा येथे 18 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर दरम्यान खेळविले जाणार आहेत.