तीन प्लॅटफॉर्मसोबत केला करार – आगामी काळात क्रिप्टोकडे कल वाढण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ मुंबई
पेमेन्ट कार्ड नेटवर्क मास्टरकार्ड आशियातील क्षेत्रात प्रथमच क्रिप्टो करन्सी (आभासी चलन) सादर करण्याच्या तयारीत आहे. याच्यासाठी कंपनीने क्रिप्टो करन्सीच्या तीन वेगवेगळय़ा प्लॅटफॉर्मसोबत करार केला आहे. सदरचा करार हा क्रिप्टो सेवा देणाऱया प्लॅटफॉर्ममध्ये अंबर, बिटकुब आणि कॉइनजार यांच्यासोबत करण्यात आल्याची माहिती आहे.
मास्टरकार्डच्या आशिया पॅसिफिकचे कार्यकारी उपाध्यक्ष रामा श्ऱीधर यांनी सांगितल्याप्रमाणे क्रिप्टो करन्सीमध्ये अलीकडे लोकांचा कल राहिला असून त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सदरच्या सोयीमुळे त्यांच्यासाठी आता नवीन गुंतवणूक प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.
अगोदरपासूनच क्रिप्टोचा स्विकार
मास्टरकार्डने या अगोदरही काही मर्चंट्सच्या माध्यमातून डिजिटल करन्सी व बिटकॉईनसह एथरियममधील पेमेन्ट स्विकारत असल्याचे म्हटले आहे. मास्टरकार्डच्या सर्वेक्षणातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार साधारण आशिया पॅसिफिक क्षेत्रातील 45 टक्के लोक हे आगामी वर्षापर्यंत क्रिप्टो करन्सीचा वापर करण्याचा विचार करु शकणार असल्याची माहिती आहे.
साधारणपणे क्रिप्टो करन्सीचा वापर सुरु करण्यासाठी कोणताही सल्ला मास्टरकार्ड देत नसून परंतु मर्चंट्स, बिजनेस व ग्राहकांसाठी डिजिटल मूल्याच्या स्वरुपात यांची सुरुवात केल्यास काही अडचण निर्माण होणार नसल्याची माहिती मास्टरकार्डने दिली आहे.