प्रतिनिधी / आचरा:
कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. यासाठी प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोरोनापासून महाराष्ट्राला सुरक्षित करण्यासाठी सुरुवात सिंधुदुर्गमधून कोरोनाचा बिमोड करून करुया, असे आवाहन माजी शिक्षणमंत्री आमदार आशिष शेलार यांनी आचरा येथे केले. सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या भेटीवर आलेल्या आशिष शेलार यांनी चिंदर, आचरा येथील कोविड सेंटरला भेट देऊन ग्रामपंचायतींना ऑक्सिमिटर आणि मास्कचे वाटप केले.
यावेळी भाजपचे अतुल काळसेकर, अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, मालवण सभापती अजिंक्मय पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, जिल्हा परिषद सदस्य जेरॉन फर्नांडिस, आचरा सरपंच प्रणया टेमकर, उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, महेश मांजरेकर, गणेश कुशे, विजय केनवडेकर, बाबा परब, भाऊ सामंत, प्रकाश मेस्त्राr, हनुमंत प्रभू, संतोष कोदे, जयप्रकाश परुळेकर, मुझफ्फर मुजावर, लवू घाडी, वृषाली आचरेकर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार नीतेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपतर्फे कोविड सेंटरमधील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.