जिल्ह्यातील भाजप पक्षाचा घेतला आढावा
प्रतिनिधी / कडेगाव
भारतीय जनता पक्षातील विशेष नेते मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगली जिल्ह्यासह प्रत्येक तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचा आढावा घेतला. जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर पालिका निवडणुकीच्या पक्षाच्या तयारीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. राजकीय, सामाजिक व जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील घटकांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला तसेच देशमुख कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची ओळख करून करीत असलेले काम, मुलांचे शैक्षणिक कामकाज यांची माहिती घेतली.
आशिष शेलार यांनी रविवारी सायंकाळी जिल्हा भाजपा अध्यक्ष मा. आ. पृथ्वीराज देशमुख (बाबा) व माजी जि. प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख (भाऊ) यांच्या घरी भेट व स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मा. आ. पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख, वृशालीताई पृथ्वीराज देशमुख, अपर्णाताई देशमुख, उघोजक रविराज देशमुख, युवा नेते विश्वतेज देशमुख, जयराज देशमुख व सुरेंद्र चौगुले उपस्थित होते.