‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमधील अभिनेत्री आश्लेषा ठाकूरला सोशल मीडियावर विवाहाचे अनेक प्रस्ताव मिळत आहेत. आश्लेषाने या वेबसीरिजमध्ये मनोज वाजपेयीची मुलगी धृति ही व्यक्तिरेखा साकारली असून यानंतर ती अत्यंत लोकप्रिय झाली आहे.
सोशल मीडियावर विवाहाचे अनेक प्रस्ताव मिळत आहेत. काही लोकांचे संदेश गोड असतात, तर काही जण विचित्र गोष्टी लिहित असतात. मला हे अटेंशन आवडत असले तरीही हे किती खरे आहे हे मी जाणत नसल्याचे आश्लेषाने एका मुलाखतीत म्हटले आहे.
एक कलाकार म्हणून मला जे करावे लागेल ते मी अवश्य करणार आहे. द फॅमिली मॅन 2 मध्ये काही किसिंग सीन चित्रित करण्यासंबंधी दिग्दर्शक राज आणि डीके यांनी माझ्या वडिलांना फोन करून कार्यालयात बोलाविले आणि त्यांच्याशी चर्चा केली होती. वडिलांनी यासंबंधी माझे मत विचारले होते. एक कलाकार म्हणून मी पुढे जाऊ इच्छित असल्याची भूमिका मी मांडली होती. मी माझ्या दिग्दर्शकांवर विश्वास ठेवते. पडद्यावर हे कसे दिसेल याची मला कुठलीच चिंता नव्हती. कारण पटकथा अत्यंत उत्तम पद्धतीने लिहिली गेल्याचे माहित होते असे आश्लेषाने म्हटले आहे.