23 एप्रिल रोजी बैठक घेणार : मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा बेमुदत आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी / बेळगाव
कणबर्गी येथील शेतकऱयांनी बुडा कार्यालयासमोर सोमवारपासून धरणे आंदोलन छेडले होते. बुडा कार्यालयासमोर स्वयंपाक करून ठाण मांडले. मंगळवारी तर संपूर्ण कुटुंबीयांसह आंदोलन छेडल्यानंतर प्रशासनाला जाग आली. तातडीने आंदोलन करणाऱया शेतकऱयांची भेट घेऊन 23 एप्रिल रोजी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱयांनी तात्पुरते हे आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले.
कणबर्गी येथील शेतकऱयांच्या जमिनी घेऊन त्या ठिकाणी बुडाकडून 61 क्रमांक योजना राबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शेतकऱयांनी त्याला तीव्र विरोध केला. कांही शेतकऱयांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र त्यांना शेतीमध्ये घरे किंवा इतर आस्थापने बांधण्यास बुडा विरोध करत आहे. त्यामुळे कणबर्गी येथील शेतकऱयांनी बुडा कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. मंगळवारी बुडा आयुक्त व आमदारांनी याबाबत लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन दिले व शेतकऱयांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. त्यामुळे शेतकऱयांनी हे आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले आहे.
शनिवार दि. 23 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता सर्किट हाऊस येथे बैठक घेतली जाणार आहे. त्या बैठकीमध्ये आमदार अनिल बेनके, बुडा आयुक्त प्रीतम नसलापूरे, बुडा चेअरमन यासह इतर सदस्य उपस्थित राहणार आहेत. शेतकऱयांच्या मागण्या मान्य केल्या तरच आम्ही आंदोलनातून माघार घेणार असल्याचे सांगितले आहे. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा बुडा कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱयांनी दिला आहे.
मंगळवारी शेतकऱयांना अटक करण्यात आली होती. शेतकऱयांनी आपल्या कुटुंबीयांसह ठाण मांडल्यामुळे बुडाच्या अधिकाऱयांनी त्यांच्याशी चर्चा केली. मात्र त्यांनी शेतकऱयांना ठोस निर्णय दिला नाही. त्यामुळे शेतकरी बेमुदत आंदोलन करणाऱयावर ठाम राहिले. त्यामुळे पोलिसांनी अखेर त्यांना अटक केली. मात्र शेतकऱयांनी आम्ही आंदोलन करणारच असे ठणकावून सांगितल्यामुळे अखेर प्रशासनाने बैठक घेण्याचे कबूल केले. या आंदोलनामध्ये बबन मालाई, भवानी मालाई, कृष्णा मालाई, महादेव मालाई, इराप्पा अष्टेकर, नारायण अष्टेकर, किसन येळ्ळूरकर, बसू येळ्ळूरकर, टोपाण्णा अष्टेकर, विश्वनाथ चरंगीमठ यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते