आष्टा / वार्ताहर
आष्टा नगरीच्या ६० व्या उपनगराध्यक्षपदी तेजश्री अनिल बोंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पीठासन अधिकारी स्नेहा माळी यांनी निवड जाहीर केली.
ऑनलाइन पद्धतीने ही निवड करण्यात आली. काकासाहेब शिंदे सभागृहात निवडीनंतर नूतन उपनगराध्यक्षा तेजश्री बोंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य झुंजारराव पाटील, नगरसेवक धैर्यशील शिंदे, मावळत्या उपनगराध्यक्षा मनिषा जाधव उपस्थित होते. कार्यसम्राट नगरसेवक अर्जुन माने, जगन्नाथ बसुगडे यांच्यासह विद्यमान चार नगरसेवकांनी ऑनलाइन निवड असतानाही दांडी मारली.
दरम्यान निवडीनंतर तेजश्री बोंडे यांचा विराज शिंदे, दिलीपराव वग्याणी, रघुनाथ जाधव, संग्राम फडतरे, व्ही. डी. पाटील, माणिक शेळके, जयदीप थोटे यांनी सत्कार केला. तेजश्री बोंडे यांनी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास तसेच स्वर्गीय विलासराव शिंदे यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले.