प्रतिनिधी /म्हापसा
आसगाव पंचायतीचे माजी सरपंच व्हिक्टर डिसोझा यांचे बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आसगाव पंचायतीच्या चार सरपंचपदाची त्यांनी सतत चारवेळा धुरा सांभाळली होती. अंत्यसंस्कार गुरुवारी सायंकाळी पोंबुर्फा येथील त्यांच्या मूळ गावी तेथील मदर ऑफ गॉड चर्चच्या स्मशानभऊमीत करण्यात आले. सामान्य मामसाच्या मदतीसाठी धावणारे अशी त्यांची आसगावात ओळख होती.