युक्रेन अध्यक्षांच्या नावाने चहा लाँच
आसाममधील एरोमिका टी-कंपनीने युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंसकी यांच्या नावावर उत्पादन लाँच केले आहे. एरोमिकाचे मालक रंजीत बरुआ याच्या माध्यमातून झेलेंस्की यांचा सन्मान करू पाहत आहेत. आम्ही युक्रेनच्या अध्यक्षांची शक्ती, साहस आणि धैर्याला सलाम करतो. त्यांनी कुठल्याही मदतीशिवाय रशियाच्या सैन्याला तोंड दिले आहे. रशियावर विजय मिळविणे अवघड असल्याचे जाणत असूनही झेलेंस्की यांनी लढाई सुरूच ठेवल्याचे बरुआ म्हणाले.
टी-कंपनीने आसामच्या कडक ब्लॅक-टीच्या नव्या उत्पादनाला झेलेंस्की यांचे नाव दिले आहे. सीटीसी चहा ब्रँड ‘झेलेंस्की’ बाजारात सादर करण्यात आला आहे. हा चहा ऑनलाईन देखील खरेदी करण्यात आला आहे. बरुआ यांच्यानुसार हा चहाची चव अन्य उत्पादनांच्या तुलनेत अत्यंत वेगळी आहे. सध्याची जागतिक स्थिती पाहता झेलेंस्की यांच्याहून अधिक प्रभावी नेता कुणीच नाही. झेलेंस्की यांच्याप्रमाणेच हा चहा देखील कडक आहे. कंपनीच्या वेबसाइटवर चहा उपलब्ध होईल असे बरुआ म्हणाले. एरोमिका ही आसाममधील प्रसिद्ध चहा कंपनी आहे. कंपनीला सुमारे 20 वर्षांचा अनुभव प्राप्त आहे.