गुवाहाटी / वृत्तसंस्था
आसामचे मुख्यमंत्री हितेश्वर सायकिया यांचा पुत्र अशोक सायकिया यांना सीबीआय न्यायालयाने कर्ज भ्रष्टाचार प्रकरणी जामीन संमत केला आहे. हे प्रकरण 25 वर्षांपूर्वीचे असून त्यावेळी अशोक सायकिया यांना 9 लाख रुपयांचे कर्ज बुडविल्यासंदर्भात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात त्यांना दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. रविवारी एक दिवस त्यांना सीबीआय कोठडीत ठेवण्यात आले होते. सोमवारी त्यांना जामीन संमत करण्यात आला. आपण 1996 मध्ये आसाम राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँकेकडून हे कर्ज घेतले होते. त्याची परतफेड करण्यात आली आहे. अटक करण्यापूर्वी आपल्याला नोटीस देण्यात आली नव्हती. अचानक अटक करण्यात आली, असा आरोपही अशोक सायकिया यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना केला.