ऑनलाईन टीम / गुवाहटी :
आसाम मधील गुवाहटीमध्ये बुधवारी सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले.भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे.
- गुवाहटीसह अनेक भागातही धक्के
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचे धक्के सकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी जाणवले. यावेळी सोनितपूरमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टल स्केल एवढी असल्याचे सांगितले जात आहे. तर तेजपुरमध्येही भूकंप झाल्याची माहिती मिळत आहे. भूकंप झाल्याची माहिती मिळताच लोकांमध्ये घबराट पसरली. लोक आपापल्या घरातून बाहेर आले. यानंतर बराच वेळ नागरिकांमध्ये भीतीचे सावट होते.
या भूकंपामुळे घराच्या भिंतींना तडे गेले आहेत. भूकंपाचा धक्का आसामसह उत्तर बंगालमध्येही बसला.काही ठिकाणी वीज खंडित झाली आहे.
आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनवाल यांनी आसामला भूकंपाचा मोठा झटका बसला आहे असे सांगितले ते म्हणाले, सर्वजण सुखरूप असतील अशी मी प्रार्थना करतो आणि नागरिकांनी सतर्क राहावे, अशा सूचनाही दिल्या. तसेच सर्व जिल्ह्यांचा आढाव घेत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
भाजपाचे आसाममधील नेते हेमंत बिस्वा शर्मा यांनीही ट्विट करून भूकंपाचे तीव्र झटके जाणवल्याची माहिती दिली. शर्मा यांनी काही फोटोही ट्विट केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनवाल यांच्याकडे झालेल्या घटनेची विचारपूस करून केंद्र सरकार सर्व प्रकारची मदत करेल असे आश्वासन दिले.