सातारा / प्रतिनिधी :
फलटण तालुक्यातील आसू येथे शिवरुपराजे यशवंत निंबाळकर यांच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून कपाटातील 7 लाख रुपये रोख व सोन्याचे दागिने असा सुमारे 15 लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली. याची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवरुपराजे निंबाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन त्यांच्या आसू येथील घरात अज्ञात चोरटयाने दि. 6 जुलै 2021 ते 11 जुलै 2021 तसेच 24 जुलै ते 29 जुलै दरम्यान त्यांच्या राहत्या घरात शिरुन बेडरुमच्या आतील बाजूस असणाऱ्या खोलीतील कपाटात ठेवलेले 7 लाख रुपये चोरुन नेले. तसेच पुन्हा कपाट तसेच लावण्यात आले. तसेच त्यांच्या सुनबाई संयुक्ता धिरेंद्र निंबाळकर यांच्या बेडरुममधील कपाटातील सोन्याचा डायमंड असणारा नेकलेस, पाच तोळ्यांचे मंगळसूत्र, चार तोळ्याची सोन्याची साखळी व रोख पन्नास हजार रुपये असा एकूण 15 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनावणे हे करत आहेत.