प्रतिनिधी / शिराळा
सुनीतादेवी व शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांचे चिरंजीव विराज व डॉ. वंदनाताई व श्री. दिनेश म्हात्रे (ठाणे) यांची कन्या चि.का.डॉ. शिमोनी यांचा विवाह मोठ्या थाटात संपन्न झाला. वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार मा. शरदचंद्र पवारसाहेब विशेष उपस्थित होते. सायंकाळी साडेपाचच्या मुहूर्तावर लग्न सोहळ्यास सुरवात झाली.
डोळे दिपवून टाकणारी आकर्षक विद्युत रोषणाई, भव्यदिव्य मंडप, स्वागत कमान, सुसज्ज भोजन व्यवस्था, पार्किंग व्यवस्था आणि नेटके नियोजन लग्न समारंभाचे आकर्षक होते. चिरंजीव विराज हे शिराळा येथील विराज इंडस्ट्रीजचे चीफ एक्सिकटिव्ह डायरेक्टर व युवा नेते आहेत. चि.सौ.का. शिमोनी या डॉक्टर असून ठाण्यातील प्रसिद्ध उद्योगपती दिनेश म्हात्रे यांच्या कन्या आहेत. नवं वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई, पुणे आदी जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील मोजके विविध मान्यवर उपस्थित होते.
त्यामध्ये प्रामुख्याने खासदार श्रीनिवास पाटील, जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, गृह (शहरे), राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार कपिल पाटील, धैर्यशील माने व संजयकाका पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सुमनताई पाटील, आमदार अनिलराव बाबर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार मोहनराव कदम, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार शेखर निकम, आमदार अरुणअण्णा लाड, आमदार प्रा. जयंत आजगावकर, डॉ. डी. वाय. पाटील सशिक्षण समूहाचे प्रमुख पी. डी. पाटील, पी. आर. पाटील, माजी आमदार बाबासाहेब पाटील, शिवाजीराव नाईक, सत्यजीत पाटील, सदाशिव पाटील, दिपकबाबा शिंदे-मैशाळकर, जनार्दनकाका पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सत्यजीत देशमुख, डॉ. रवींद्र शिसवे, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, विश्वास कारखाण्याचे सर्व संचालक आदी मान्यवर उपस्थित होते. अत्यंत दिमाखदार पद्धतीने विवाह सोहळा संपन्न झाला.