संपर्कात आलेल्या कार्यकर्ते व नातेवाईकांना चाचणी करून घेण्याचे आवाहन
शिराळा / वार्ताहर
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व शिराळा मतदार संघाचे आमदार मानसिंगराव नाईक व त्यांचे चिरंजीव राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने आरटीपीसीआर चाचणी केली असता या चाचणीमध्ये दोघांचाही अहवाल पॉजिटिव्ह आला आहे.
सध्या आमदार मानसिंगराव नाईक व जिल्हाध्यक्ष विराज नाईक डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार घेत आहेत. तरी संपर्कात आलेले कार्यकर्ते व नातेवाईक यांनी सुद्धा आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आव्हान दोघांनी केले आहे. सध्या आमदार मानसिंगराव नाईक व जिल्हाध्यक्ष विराज नाईक होमक्वारंटाईन आहेत.