वृत्तसंस्था/ टिरेना
फिफाच्या 2022 साली होणाऱया विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठीच्या सध्या विविध ठिकाणी चालू असलेल्या पात्र फेरीच्या फुटबॉल स्पर्धेतील रविवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडने अल्बेनियाचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला. इंग्लंड संघातील हॅरी केनचा गोल नेंदविण्याचा दुष्काळ या सामन्यात संपुष्टात आला.
इंग्लंड संघातील हॅरी केनला गेल्या सहा सामन्यांमध्ये गोल नोंदविता आला नव्हता. इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने या सामन्यात पूर्वार्धात गोल नोंदविला. 2019 च्या नोव्हेंबरनंतर हॅरी केनचा आंतरराष्ट्रीय सामन्यातील हा पहिला गोल आहे. आतापर्यंत हॅरी केनने 52 सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधीत्व करताना 31 गोल नोंदविले आहेत. रविवारच्या सामन्यात हॅरी केनच्या पासवर मॅसन माऊंटने इंग्लंडचा दुसरा गोल केला. पात्र फेरीच्या स्पर्धेत इंग्लंडने आपल्या गटातील सलग दोन सामने जिंकले आहेत.