वृत्तसंस्था/ लंडन
वेगवान गोलंदाज ओली स्टोनबरोबर इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱया नॉटिंगहॅमशायर क्रिकेट क्लबने नुकताच नवा करार केला. स्टोनबरोबर या क्लबने तीन वर्षांचा करार केल्याची घोषणा या क्लबच्या व्यवस्थापकाने शनिवारी केली.
28 वर्षीय ओली स्टोन यापूर्वी वॉर्विकशायर क्रिकेट क्लबकडून खेळत होता. या क्लबबरोबरचा त्याचा करार चालू वर्षाअखेरीस संपुष्टात येणार आहे. हा करार संपण्यापूर्वीच नॉटिंगहॅमशायरने त्याच्याशी नवा करार करण्याचा झटपट निर्णय घेतला. ओली स्टोनने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 44 प्रथम श्रेणी सामन्यात 24.78 धावांच्या सरासरीने 150 बळी मिळविले आहेत. त्याने तीन कसोटी सामन्यात 10 गडी बाद केले आहेत. इंग्लिश कौटी क्रिकेटमध्ये त्याने वॉर्विकशायर संघाकडून खेळताना वनडे सामन्यात 85 गडी बाद केले आहेत. तसेच त्याने चार वनडे सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले आहे.