वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंड क्रिकेट संघाचा आगामी बांगलादेश दौरा लांबणीवर टाकण्यात आला असून तो आता 2023 च्या मार्च दरम्यान आयोजित केला आहे. यापूर्वी हा दौरा येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान निश्चित केला होता पण कोरोना महामारी समस्येमुळे सदर दौऱयाच्या वेळापत्रकात बदल करत आता हा दौरा 2023 च्या मार्चमध्ये निश्चित केल्याची माहिती इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने दिली.
इंग्लंड संघाच्या या आगामी बांगलादेश दौऱयात तीन वनडे सामने तसेच तीन टी-20 सामने होणार आहेत. इंग्लंडचा बांगलादेश दौरा लांबणीवर टाकल्याने आता इंग्लंड क्रिकेटपटूंना येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान संयुक्त अरब अमिरातमध्ये होणाऱया आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सहभागी होता येईल.