वृत्तसंस्था/ लंडन
चालू महिन्याच्या अखेरीस खेळविल्या जाणाऱया 21 वर्षाखालील वयोगटाच्या युरोपियन चॅम्पियन्सशीप फुटबॉल स्पर्धेसाठी सोमवारी इंग्लंडच्या फुटबॉल फेडरेशनने 23 जणांचा संघ जाहीर केला आहे. इंग्लंडच्या या संघामध्ये कॅलम हडसन ओडोई आणि मॅसन ग्रीनवूड यांचा समावेश करण्यात आला आहे.
युरोपियन चॅम्पियनशीप फुटबॉल स्पर्धा 24 मार्चपासून खेळविली जाणार आहे. या स्पर्धेत 16 संघांचा समावेश राहील. प्राथमिक फेरीतील सामने 24 ते 31 मार्च दरम्यान खेळविले जातील. त्यानंतर चार विविध गटातील विजेते आणि उपविजेते संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील.