लंडन/ वृत्तसंस्था
कोरोना महामारी संकटामुळे इंग्लंडमध्ये ठप्प झालेल्या क्रिकेट हालचालींना पुन्हा जवळपास तीन महिन्यांच्या कालावधीनंतर पेर सुरूवात होत आहे. सोमवार 22 जूनपासून इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूंच्या सरावाला प्रारंभ होणार आहे. वैयक्तिक प्रशिक्षण सराव शिबीरात इंग्लंडच्या 24 महिला क्रिकेटपटूंची यादी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने जाहीर केली आहे.
चालू वर्षाच्या अखेरीस महिलांची तिरंगी मालिका खेळविली जाणार असून यामध्ये इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी इंग्लंडच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयात तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळविले जाणार आहेत. सध्याच्या स्थितीत कोरोना परिस्थितीमुळे भारतीय महिला संघाचा हा इंग्लंड दौरा लांबणीवर टाकण्यात आला आहे. दरम्यान इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने बीसीसीआय आणि क्रिकेट द. आफ्रिका यांच्याशी संपर्क साधला असून चालूवर्षा अखेर इंग्लंडमध्ये महिलांची ही तिरंगी मालिका पार पाडण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.