लंडन
इंग्लंडच्या राष्ट्रीय फुटबॉल संघातील बचावफळीत खेळणारा तसेच लिड्स फुटबॉल क्लबचा माजी खेळाडू नॉर्मन हंटर यांना कोरोनाची बाधा झाली असून वैद्यकीय इलाजाकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 76 वषीय हंटर यांची प्रकृती स्थिर असल्याचे लिड्स फुटबॉल क्लबच्या वरि÷ अधिकाऱयाने सांगितले. हंटर यांनी आपल्या फुटबॉल कारकीर्दीत लिड्स युनायटेड क्लबला दोन वेळा इंग्लिश प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्मयपद मिळवून दिले होते. या क्लबतर्फे त्यांनी 540 सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. 1960 आणि 1970 च्या दशकामध्ये हंटर यांनी आपल्या फुटबॉल कारकीर्दीत लिड्स युनायटेड संघाला विविध स्पर्धांमध्ये चांगले यश मिळवून दिले होते. 1982 साली त्यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून निवृत्ती पत्करली होती.