वृत्तसंस्था/चेस्टर ली स्ट्रीट
इंग्लंडच्या जो रूटने 150 वा वनडे सामना नाबाद अर्धशतकाने साजरा करीत आपल्या संघाला पहिल्या वनडे सामन्यात लंकेवर 5 गडय़ांनी विजय मिळवून दिला. 18 धावांत 4 बळी घेणाऱया ख्रिस वोक्सला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर कुसल परेरा (73) व वनिंदू हसरंगा (54) यांच्या अर्धशतकानंतरही इतरांनी निराशा केल्याने लंकेचा डाव 42.3 षटकांत 185 धावांत आटोपला. वोक्सने 4, डेव्हिड विलीने 3 बळी मिळविले. त्यानंतर इंग्लंडने 34.5 षटकांत 5 बाद 189 धावा जमवित सहज विजय मिळविला. रूटने नाबाद 79, बेअरस्टोने 43, मोईन अलीने 28 धावा जमविल्या. लंकेच्या दुश्मंता चमीराने 50 धावांत 3 बळी मिळविले. दुसरा सामना द ओव्हलवर गुरुवारी होणार आहे.
संक्षिप्त धावफलक ः लंका 42.5 षटकांत सर्व बाद 185 (कुसल परेरा 73, हसरंगा 54, वोक्स 4-18, विली 3-44), इंग्लंड 34.5 षटकांत 5 बाद 189 (रूट नाबाद 79, बेअरस्टो 43, चमीरा 3-50).