नवी दिल्ली / वृत्तसंस्था
युवा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन, सुर्यकुमार यादव व राहुल तेवातिया यांचा इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात समावेश केला गेला आहे. सुर्यकुमार यादवला मुंबईतर्फे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये व आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सतर्फे केलेल्या सातत्यपूर्ण योगदानामुळे येथे संधी मिळाली. मुंबई इंडियन्सकडूनच खेळणारा इशान किशन देखील मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये उत्तम बहरात असून येथे तो रिषभ पंतनंतर दुसरा यष्टीरक्षक-फलंदाज असेल. हरियाणाच्या तेवातियालाही आयपीएल गाजवल्यानंतर येथे संधी दिली गेली. फिरकीपटू कुलदीप यादव, मनीष पांडे यांना डच्चू दिला गेला असून जलद गोलंदाज बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. भारत-इंग्लंड यांच्यात दि. 12 मार्चपासून टी-20 मालिका खेळवली जाणार आहे.
भारतीय टी-20 संघ ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंडय़ा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवातिया, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर.