प्रतिनिधी/ मडगाव
बोर्डा – मडगाव येथील ग्लेन पेरैरा याची इंग्लंडहून आलेली शवपेटी दिल्लीत खोलताना ती शवपेटी काही प्रमाणात नादुरुस्त झाली होती आणि म्हणून शवचिकित्सेनंतर नादुरुस्त शवपेटी गोव्यात पाठविण्याऐवजी मृतदेह नव्या शवपेटीत घालून गोव्याला पाठविण्यात आला होता अशी अधिकृतरित्या माहिती उपलब्ध झालेली आहे.
विदेशी जहाजावर काम करीत असलेल्या ग्लेन पेरैरा याना 8 एप्रिल 2020 रोजी इंग्लंडमध्ये मृत्यू आला होता. ताप आल्याने आणि हृदय विकाऱयाच्या झटक्याने ग्लेन याला मृत्यू आल्याचे शिप्पींग कंपनीने मयताच्या घरी कळविले होते.
इंग्लंडमध्ये मृत्यू आलेल्या बोर्डा – मडगाव येथील ग्लेन पेरैरा याची शवपेटी जेव्हा दिल्लीला आली तेव्हा ती शवपेटी दिल्ली प्रशासनाने उघडली आणि मृतदेहाची चिकित्सा केल्यानंतर कारोनामुळेच मृत्यू आल्याचे दिल्ली प्रशासनाला स्पष्ट झाले होते.
ही शवपेटी दिल्लीत खोलताना काही प्रमाणात नादुरुस्त झाली होती. नादुरुस्त झालेली ही शवपेटी गोव्याला पाठवणे दिल्ली प्रशासनाला न पटल्याने तेथील प्रशासनाने नवी शवपेटी आणली आणि त्यातून ग्लेन पेरैरा याचा मृतदेह गोव्यात पाठवला होता आणि त्यामुळेच इंग्लंडहून शिप्पींग कंपनीने पाठविलेल्या शवपेटीचा रंग आणि दिल्लीहून गोव्यात आलेल्या शवपेटीचा रंग वेगवेगळा झाला होता अशी सुत्रानी माहिती दिली.
दोन शवपेटीचे रंग वेगवेगळे असल्यामुळे शवपेटीतील मृतदेह हा आपल्याच मुलाचा का अशी शंका मयताचे वडिल फ्रान्सिस्क पेरैरा यांना आली होती आणि म्हणून आपल्या मुलासंबंधी खात्री करण्यासाठी दफन केलेला मृतदेह उकरुन काढण्यास परवानगी द्यावी म्हणून दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयांकडे परवानगी मागितली होती. आता या प्रकरणी द. गोवा जिल्हाधिकारी काय निर्णय घेता याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.