वृत्तसंस्था/ लंडन
येत्या गुरूवारपासून एजबॅस्टन येथे होणाऱया न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱया आणि शेवटच्या कसोटीसाठी इंग्लंडच्या निवड समितीने सोमवारी संघाची घोषणा केली. या संघामध्ये फिरकी गोलंदाज डॉम बेसचा समावेश करण्यात आला आहे. उभय संघातील पहिली कसोटी रविवारी अनिर्णित अवस्थेत संपुष्टात आली. आता दुसरी कसोटी येत्या गुरूवारपासून खेळविली जाणार आहे. इंग्लंड संघातील ऑली रॉबिन्सन याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बंदीची कारवाई केली असल्याने नवोदित फिरकी गोलंदाज बेसला संधी देण्यात आल्याचे प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड यांनी सांगितले. इंग्लंड संघातील फिरकी गोलंदाज लिच हा पूर्ण तंदुरूस्त नसल्याने बेसला दुसऱया कसोटीसाठी संधी देण्यात आली आहे.