वृत्तसंस्था/ लंडन
लॉर्डस् मैदानावर गेल्या आठवडय़ात झालेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने गोलंदाजीत षटकांची गती न राखल्याने त्यांना आयसीसीच्या सामनाधिकाऱयाने दंड ठोठावला आहे.
उभय संघातील ही पहिली कसोटी अनिर्णित अवस्थेत संपली. या सामन्यात रूटच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाला षटकांची गती राखता आली नाही. त्यामुळे आता या संघातील खेळाडूंना मिळणाऱया मानधनातील 40 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे. कर्णधार रूटने हा गुन्हा मान्य केला असून आता या संघातील खेळाडूंना दंडाची रक्कम द्यावी लागणार आहे.