प्रतिनिधी/ पणजी
गोवा व युके (इंग्लंड) यांच्या दरम्यान डिसेंबरच्या शेवटी चार विमाने उड्डाण करणार होती, मात्र ती रद्द करण्यात आली आहे. हा निर्णय इंग्लंडमध्ये कोरोना वाढल्यामुळे केंद्र सरकारतर्फे घेण्यात आला आहे. दि. 22 रोजी मध्यरात्री पर्यंत गोव्यात दाखल होणाऱया विमान प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी दाबोळी विमानतळावर उतरल्याबरोबर करावी लागणार आहे, अशी माहिती दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांनी कळविले आहे.