वृत्तसंस्था/ लंडन
प्रतिष्ठेच्या इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेसाठी प्रत्येक संघाला दोन विदेशी खेळाडूंना प्रवेश देण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता या कौंटी स्पर्धेत सहभागी होणाऱया प्रत्येक संघात इंग्लंडच्या नऊ खेळाडूंना संधी मिळू शकेल.
इंग्लंडच्या या प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱया कौंटी क्लब संघांना आता दोन विदेशी खेळाडूंना मैदानात उतरविता येईल. यापूर्वी केवळ एका विदेशी खेळाडूला संधी दिली जात होती. पुढील वषीच्या क्रिकेट हंगामातील या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी त्याचप्रमाणे रॉयल लंडन चषक स्पर्धेकरिता विदेशातील क्रिकेटपटूंनी आपली नोंद केली असल्याचे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले. क्रिकेट समितीच्या शिफारशीनंतरच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने हा वरील निर्णय घेतला आहे.
कौंटी क्रिकेटमध्ये विदेशी खेळाडूंना खेळण्याची अधिक उत्सुकता आहे. दरम्यान, बऱयाच विदेशी खेळाडूंनी इंग्लिश कौंटी क्रिकेट बरोबरचे आपले संबंध जपले आहेत. आता या नव्या निर्णयामुळे या स्पर्धेसाठी कौंटी क्लबच्या संघामध्ये समतोलता दिसेल, असे स्ट्रॉस यांनी म्हटले आहे.