वृत्तसंस्था/ लंडन
कोरोना महामारी संकटामुळे ब्रिटनमधील सर्व क्रीडास्पर्धा गेल्या मार्चपासून संपूर्णपणे थांबविण्यात आल्या आहेत. फुटबॉल, क्रिकेट, टेनिस स्पर्धा लांबणीवर किंवा स्थगित करण्यात आल्या. दरम्यान 2019-20 चा इंग्लीश महिला फुटबॉल हंगाम समाप्त झाल्याची घोषणा सोमवारी इंग्लीश महिला फुटबॉल संघटनेतर्फे करण्यात आली.
इंग्लंडमधील एफए महिलांची सुपर लीग तसेच महिलांच्या चॅम्पियनशीप बोर्डने 2019-20 चा इंग्लीश महिला फुटबॉल हंगाम समाप्त झाल्याच्या निर्णयाला अधिकृत दुजोरा दिला आहे. मात्र या दोन्ही स्पर्धेतील अंतिम गुणतक्त्यातील संघाची घोषणा करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नसून या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले. इंग्लीश प्रिमियर लीग पुरूषांच्या फुटबॉल स्पर्धेत गुणतक्त्यात आघाडीवर असलेल्या चेल्सी संघाला विजेता म्हणून घोषित केले जाईल.