गुजरात-भुजमध्ये इमर्जन्सी लँडिंग, 70 प्रवाशांच्या जीवाला होता धोका
@ गांधीनगर / वृत्तसंस्था
मुंबई येथून भुजला (गुजरात) जाणारे अलायन्स एअरचे विमान भीषण अपघातातून थोडक्मयात बचावले आहे. 70 प्रवाशांना घेऊन या विमानाने इंजिन कव्हरशिवाय उड्डाण केल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी नागरी आणि विमानोड्डाण मंत्रालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालक (डीजीसीए), विमान वाहतूक क्षेत्राचे पर्यवेक्षक आता या प्रकरणाकडे लक्ष देत आहेत. निकृष्ट देखभालीमुळे हा अपघात झाला असावा, असे अधिकाऱयांचे म्हणणे आहे.
मुंबईहून उड्डाण करणाऱया अलायन्स एअरच्या एटीआर-72 विमानाला हा अपघात झाला. विमानात चार क्रू मेंबर्स आणि विमान देखभाल अभियंता यांच्यासह 70 जण होते. मात्र, या अपघातात विमानाचे फारसे नुकसान झाले नाही. टेक ऑफ करताना इंजिनचे कव्हर घसरल्याने हा अपघात झाला. उड्डाणाच्या वेळी, मॉनिटरिंग एअर ट्रफिक कंट्रोलकडून अलर्ट आला, त्यानंतर विमानाचा भाग धावपट्टीवर सापडला. एटीआर 72-600 विमान व्हीटी आरकेजे मुंबईहून भुजला जात असताना इंजिनचे कव्हर शरीरापासून वेगळे होऊन धावपट्टीवर पडले, असे एव्हिएशन तज्ञ कॅप्टन अमित सिंग यांनी सांगितले.