संयुक्त राष्ट्र
20 मार्च हा दिवस संयुक्त राष्ट्रातर्फे प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय आनंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. आनंद वाटण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. अशाच प्रकारे जगभरात प्रत्येक गोष्टीसाठी एक विशेष दिवस साजरा केला जातो. तसाच ‘इंटरनॅशनल डे ऑफ हॅप्पीनेस’ अंातरराष्ट्रीय दिवस साजरा होतो. संयुक्त राष्ट्राने 20 मार्च रोजी हा दिवस साजरा करण्यात येत असून याची मूळ सुरुवात वर्ष 2013 मध्ये संयुक्त राष्ट्राने केली. आनंदी जीवनाचे महत्व लक्षात यावे व त्यासंबंधी जागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 12 जुलै 2012 मध्ये ही संकल्पना सादर केली होती. हाच मुद्दा लक्षात घेत प्रसिद्ध समाजसेवक जेमी इलियनच्या प्रयत्नामधून त्यांच्या विचारांचे मत चर्चेत घेत संयुक्त राष्ट्राकडून 20 मार्च 2013 रोजी ‘इंटरनॅशनल डे ऑफ हॅप्पीनेस’ या दिवसाची घोषणा करण्यात आल्याची माहिती सादर करण्यात आली आहे. गरीबी, असमानता दूर होण्याची खरी गरज असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.