इंटरपोलने बुधवारी रात्री एक जागतिक स्तरावर इशारा दिला आहे. कोविड-19 च्या काळात काही लोक संघटित गुन्हय़ांमध्ये सामील होत असून ते बनावट लस पुरवू शकतात, असे इंटरपोलकडून सर्व देशांना सांगण्यात आले आहे. पॅरिस येथे मुख्यालय असलेल्या या यंत्रणेने यासंबंधी 194 देशांना इशारा दिला आहे. कुठल्याही प्रकारची बनावट लस लोकांपर्यंत पोहोचू नये हे निश्चित करा. याकरता ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरही नजर ठेवा. तसेच लसउत्पादक कंपन्या आणि तपास यंत्रणांदरम्यान ताळमेळ राखला जावा, असे इंटरपोलकडून सांगण्यात आले आहे.
Previous Articleअमेरिकेत बळी वाढले
Next Article 101 वर्षीय मारिया यांची कोरोनावर 3 वेळा मात
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.