वृत्तसंस्था/ रोम
कोरोना महामारीमुळे इटलीतील सर्व फुटबॉल स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या पण आता क्लब स्तरावरील फुटबॉल स्पर्धा लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न चालू आहे. इटलीतील विविध फुटबॉल क्लबच्या फुटबॉलपटूंची कोरोना चाचणी घेण्यात आली. या चाचणीत इंटर मिलान संघातील एकाही फुटबॉलपटूला कोरोनाची बाधा झाली नसल्याचे आढळून आले. आता इंटर मिलानच्या फुटबॉलपटूंनी प्रशिक्षण शिबीराला प्रारंभ करण्याचे ठरविले आहे.
इटालियन फुटबॉल लिग स्पर्धेत सहभागी होत असलेल्या काही क्लबनी अलिकडेच प्रशिक्षण शिबीराला प्रारंभ केला आहे. पण 18 मे पासून क्लबचे सांघिक प्रशिक्षण शिबीर सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.