वृत्तसंस्था/ रोम
इटालियन चषक फुटबॉल स्पर्धेत इंटर मिलान संघाने बुधवारी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविताना झालेल्या सामन्यात फिरेंटिनानाचा 2-1 अशा गोल फरकाने पराभव केला.
या सामन्यात इंटर मिलान संघाकडून पहिल्यांदाच खेळणाऱया ख्रिस्टेन एरिक्सन आणि व्हिक्टर मोजेस याना संधी देण्यात आली होती. इंटर मिलानतर्फे एरिक्सन आणि बॅरेला यानी प्रत्येकी एक गोल केला. फिरोंटिनातर्फे एकमेव गोल निकोला मिलेनकोव्हिकने केला.