0.39 टक्के हिस्सेदारीसाठी इंटेलची हातमिळवणी
वृत्तसंस्था/ मुंबई
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या जिओ प्लॅटफॉर्ममध्ये कंपन्यांकडून गुंतवणुकीचा ओघ सुरुच असल्याचे पहावयास मिळत आहे. अमेरिकन कंपनी इंटेल कॉर डी पोरेशनची सहकारी इंटेल कॅपिटल जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 1894.50 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. सदरच्या गुंतवणुकीच्या मदतीने इंटेल कॅपिटल जिओमधील 0.39 टक्के हिस्सा आपल्याकडे घेणार असल्याची घोषणा कंपनीने केली असल्याची माहिती रिलायन्सने दिली आहे.
रिलायन्सकडून देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे इंटेल कॅपिटलसोबत गुंतवणुकीनंतर जिओ प्लॅटफॉर्मचे 4.91 लाख कोटी रुपयांचे इक्विटी मूल्य झाले आहे. जिओ प्लॅटफॉर्मचे एंटरप्राईजेस मूल्य 5.16 लाख कोटी रुपयापर्यंत निश्चित करण्यात आले आहे.
12 गुंतवणुकीसोबत जोडले 1.17 लाख कोटी
आरआयएलने जिओ प्लॅटफॉर्मच्या हिस्सेदारी विक्रीतून 1,17,588.45 कोटी रुपये जोडले आहेत. 11 कंपन्यांच्या मदतीने 12 गुंतवणुकीच्या सहाय्याने ही झेप जिओने घेतली आहे तर यामध्ये फेसबुकने सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. फेसबुकने तब्बल 9.99 टक्के हिस्सेदारी घेण्यास 43,573.62 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
इंटेल चिप निर्मितीत कार्यरत
इंटेल कॉर्पोरेशन जगभरातील कॉम्प्युटर चिप बनविण्यासाठी प्रसिद्ध कंपनी म्हणून ओळखली जाते. इंटेल कॅपिटल इनोव्हेटीव्ह कंपन्यांमध्ये जागतिक पातळीवर गुंतवणूक करण्यासोबत कंपनी क्लाउड कम्प्युटिंग, आर्टिफिशल इंटेलिजेंस आणि 5 जी यासारख्या तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करते. ज्यामध्ये जिओही कार्यरत आहे. तसेच इंटेल दशकापेक्षा अधिक वेळ भारतात काम करत राहिली आहे.
इंटेलचे डिजिटल सोसायटीसाठी सहाय्य : मुकेश अंबानी
जगातील तंत्रज्ञान बाजाराच्या नेतृवासोबत आमचे संबंध जोडले जाणे ही बाब आमच्यासाठी आनंद देणारी असून येत्या काळात देशाला डिजिटल सोसायटी बनविण्यास आम्हाला इंटेलचे सहाय्य उपयोगी पडणार असल्याचा विश्वास आहे.
भारताच्या डिजिटल बदलास प्रोत्साहन : वेंडेल ब्रूक्स, इंटेल
भारतामध्ये कमी क्षमता असणाऱया डिजिटल सेवांना ताकद देण्यासाठी आणि जिओ प्लॅटफॉर्मला आमच्या प्रभावशाली इंजिनिअरिंगच्या क्षमतेचा उपयोग करुन देत येणाऱया काळात डिजिटल बदलावर भर दिला जाईल.