प्रतिनिधी / बेळगाव
भुतरामहट्टी नजीक असलेल्या इंडस् अल्टम इंटरनॅशनल स्कूलला शिक्षण जगतातील ग्रॅन्ड ज्युरी ऍवॉर्डने गौरविण्यात आले आहे. ‘इमर्जिंग हाय पोटॅन्शियल स्कूल्स’ क्रमवारी अंतर्गत या शाळेला भारतातील सर्व शाळांमध्ये आठवा क्रमांक मिळाला आहे.
नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या शानदार सोहळय़ात शाळेचे सीईओ व कार्यकारी संचालक निवृत्त लेफ्टनंट जनरल अर्जुन रे (व्हीएसएम पीव्हीएसएम), निवृत्त लेफ्टनंट कर्नल सत्या राव व प्राचार्या सरोजनी राव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कर्नाटकात ही शाळा प्रथम क्रमांकावर असून उत्कृष्ट विद्यार्थी घडविणे आणि त्यांचे भवितव्य उज्वल करणे हे आपले ब्रिद असल्याचे रे यांनी स्पष्ट केले.