ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
IOC पुढील तीन वर्षात 10,000 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारणार आहे ,त्यांच्या या उपक्रमातुन हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी पुढाकार घेत आहे.
देशाच्या “नेटझेरो कार्बन लक्ष्य 2070 चे लक्ष साध्य करण्यासाठी सरकारी रिफायनर्सनी हजारो इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग स्टेशन तयार करण्याची योजना जाहीर केली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) पुढील तीन वर्षांत 10,000 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स स्थापन करेल आपल्या उपक्रमातून हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी योजना आखत आहे, असे IOC च्या अध्यक्षांनी बुधवारी सांगितले.
भारत पेट्रोलियमने येत्या काही वर्षांत त्यांच्या 7000 इंधन केंद्रांवर ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना बुधवारी जाहीर केली. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनने सप्टेंबरमध्ये तीन वर्षांत देशात 5,000 ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची योजना जाहीर केली होती.