मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आयओसी (इंडियन ऑईल कॉर्पोरेशन) ने घरापर्यंत डिझेल उपलब्ध करण्याच्या कार्याला प्रारंभ केला आहे. ऍपच्या माध्यमातून सदरचा पुरवठा केला जाणार आहे. याकरिता हमसफर इंडिया व ओकारा फ्यूलोजिकसशी आयओसीने करार केला आहे. सुरुवातीला कंपनीने मुंबई व आसपासच्या भागात डिझेल पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. हमसफरने या आधी परिवहन व लॉजिस्टिक कंपनी ओकारासोबत महाराष्ट्रात सदर सेवेसाठी भागीदारी केली होती. दोन्ही कंपन्यांचे लक्ष पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नवी मुंबई, सोलापूरसह राज्यातील विविध शहरावर असून येणाऱया काळात घरापर्यंत डिझेल पोहोचवण्याची सेवा लवकरात लवकर अंमलात आणायची आहे.
Previous Articleआपत्तीनंतर उदंड झाले दौरे
Next Article देशव्यापी एनआरसीचा निर्णय नाही
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.