ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालच्या हल्दीया येथील इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या (आयओसी) कॅम्पसमध्ये भीषण आग लागली आहे. या भीषण आगीत तीन कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 35 जण जखमी आहेत. जखमींना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन हॉस्पिटल आणि कोलकाता पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये मॉक ड्रिल करण्यात आले. मॉक ड्रिलनंतर एका प्लॅन्टमध्ये शटडाऊनचे काम सुरू होते. त्यावेळी ड्रिलिंगदरम्यान ही आग लागली. क्षणार्धात आगीने उग्र रूप धारण केले. आयओसीमधील 10 फायर इंजिनच्या मदतीने ही आग आटोक्यात आणल्याची माहिती मिळत आहे.