बेळगाव
केएलएस गोगटे इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, बेळगाव येथील सिव्हिल इंजिनिअरिंग असोसिएशनच्या बॅनरखाली सिव्हिल विभागाने 6 मे 2022 रोजी जीआयटी कॅम्पसमध्ये इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आय.जी.बी.सी) विद्यार्थ्यांच्या चॅप्टरच्या शुभारंभाचे आयोजन केले होते.
विद्यार्थी समुदायामध्ये ग्रीन बिल्डिंगबद्दल जागरुकता पसरवणे आणि तरुणांच्या मनात पर्यावरणपूरक रचनांची कल्पना प्रज्वलित करणे या उद्देशाने ‘आयजीबीसी स्टुडंट चॅप्टर’ची स्थापना केली जात आहे. ज्यामुळे 2025 पर्यंत हरित इमारत संकल्पना स्वीकारण्यात भारत जागतिक नेत्यांपैकी एक बनण्यास मदत करेल.
वास्तुशिल्प रचना, पाण्याची कार्यक्षमता, कचऱयाची प्रभावी हाताळणी, ऊर्जा कार्यक्षमता, टिकाऊ इमारती आणि रहिवाशांच्या सुखसोयी आणि पर्यावरणास अनुकूल इमारती तयार करण्यासाठी सर्वांगीण दृष्टीकोन सुलभ करणे हे चॅप्टरचा मूळ ध्येय आहे. हे युनिट विद्यार्थ्यांना इको-प्रेंडली स्ट्रक्चर्सवर प्रशिक्षण, हरित इमारतींबद्दल तज्ञ व्याख्याने आणि इंटर्नशिप संधी यासारखे उपक्रम आयोजित करेल.
प्रमुख पाहुणे राजेंद्र बेळगावकर, अध्यक्ष, आयजीबीसी बेळगाव चॅप्टर आणि जीआयटी गव्हर्निंग बोर्डचे चेअरमन यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले आणि विद्यार्थ्यांना आयजीबीसीचे सध्याच्या संदर्भात हरित इमारतींबद्दल माहिती दिली आणि युनिट चॅप्टरचे प्रमाणपत्र प्राचार्य जे. के. कित्तूर यांच्याकडे सुपूर्द केले.
रेखा मावुलाटी, आयजीबीसी विद्यार्थी युनिट सल्लागार यांनी उपस्थितांना हरित इमारतींच्या संकल्पना आणि विद्यार्थ्यांच्या उपक्रमाविषयी माहिती दिली.
सिव्हिल अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. वैभव आर. चाटे यांनी स्वागत केले. प्रा. कीर्ती एम. एन. यांनी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. जयंत कित्तूर, प्राचार्य के.एल.एस. जीआयटी यांनी विद्यार्थी युनिटचे महत्त्व सांगितले. प्रा. सचिन कुलकर्णी यांनी आभार मानले. 250 हून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.