कोल्हापूर / प्रतिनिधी
इंडियन डेंटल असोसिएशनच्या केंद्रीय कार्यकारिणीवर कोल्हापूरचे प्रसिद्ध दंतवैद्य डॉ. राजेंद्र भस्मे आणि राज्य सचिव डॉ. विकास पाटील यांची एकमताने निवड झाली आहे. असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य शाखेची 60 वी राज्यस्तरीय दंतवैद्यक परिषद नुकतीच बारामती येथे झाली. यावेळी झालेल्या सर्वसाधारण सभेत राज्य शाखेकडून केंद्रीय कार्यकारिणीवर पाठविण्यात येणाऱया सभासदांची निवडणूक झाली. यामध्ये कोल्हापूर शाखेचे आजीव सदस्य डॉ. राजेंद्र भस्मे आणि राज्य सचिव डॉ. विकास पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. डॉ. भस्मे वैद्यकीय व्यवसाय सांभाळत क्रीडा पत्रकार, विश्लेषक म्हणून कार्यरत आहेत. विविध सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग असतो. आजवर त्यांनी इंडियन डेंटल असोसिएशनचे उपक्रम राबविले आहे. डेंटल डायलॉगचे संपादनही त्यांनी केले आहे.