नूतन अध्यक्षपदी इकॉनॉमिक टाईम्सचे मोहित जैन
प्रतिनिधी /बेळगाव
इंडियन न्यूज पेपर सोसायटीच्या कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांची निवड झाली आहे. सोसायटीची 82 वी वार्षिक सर्वसाधारण सभा यंदा ऑडिओ व्हिज्युअल पद्धतीने झाली. या सभेत सोसायटीचे 2021-22 साठीचे नूतन अध्यक्ष म्हणून इकॉनॉमिक टाईम्सचे मोहित जैन यांची निवड झाली. के. राजाप्रसाद रेड्डी (साक्षी) व राकेश शर्मा (आर्य समाज) यांची उपाध्यक्ष म्हणून तर तन्मय माहेश्वरी (अमर उजाला) यांची खजिनदार म्हणून निवड झाली. मेरी पॉल यांची सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे.
कार्यकारिणीतील सदस्य पुढीलप्रमाणे- एस. बालसुब्रमण्यम आदित्यन (डेली तंती), गिरीश अगरवाल (दै. भास्कर), समाहित बाल (प्रगतीवादी), गौरव चोप्रा (फिल्मी दुनिया), विजयकुमार चोप्रा (पंजाब केसरी), करण दर्डा (लोकमत), विजय दर्डा (लोकमत), जगजितसिंग दर्दी (शरदीकला), विवेक गोयंका (इंडियन एक्स्प्रेस), महिंद्र गुप्ता (जागरण), प्रदीप गुप्ता (डाटा क्वेस्ट), संजय गुप्ता (जागरण), शिवेंद्र गुप्ता (बिझनेस स्टँडर्ड), विवेक गुप्ता (सन्मार्ग), सरविंदर कौर (अजित), एन. व्ही. श्रेयांशकुमार (मातृभूमी), आर. लक्ष्मीपती (दिनामलार), विलास मराठे (दै. हिंदुस्थान), हर्षा मॅथ्यू (वनिता), दिनेश मित्तल (हिंदुस्थान टाईम्स), नरेश मोहन (संडे स्टेट्समन), अनंत नाथ (गृहशोभिका), प्रताप पवार (सकाळ), डी. डी. पूरकायस्थ (आनंदबाजार), राहुल राजखेवा (द सेंटिनेल), आर. एम. आर. रमेश (दिनाकरन), आतिदाब सरकार (द टेलिग्राफ), बिजू वर्गीस (मंगलम), आय. वेंकट (अन्नदाता), होर्मुसजी कामा (बॉम्बे समाचार), कुंदन व्यास (व्यापार), के. एन. तिलककुमार (डेक्कन हेरॉल्ड व प्रजावाणी), रविंद्रकुमार (द स्टेट्समन), किरण वडोदरिया (शांभव मित्रो), पी. व्ही. चंद्रन (गृहलक्ष्मी), सोमेश शर्मा (राष्ट्रदूत), जयंत मॅथ्यू (मल्याळम मनोरमा), शैलेश गुप्ता (मिड डे), एल. आदिमूलम (हेल्थ अँड अँटिसेप्टिक).