आनेवाडी / प्रतिनिधी :
डॉक्टरांची संघटना असलेल्या इंडियन मेडीकल असोशिएशनच्या सातारा अध्यक्षपदी डॉ. निलेश थोरात यांची बहुमताने निवड झाली आहे. उपाध्यक्ष पदी डॉ. दीपक थोरात, सचिव पदी डॉ. शरद जगताप आणि खजिनदार पदी डॉ. सागर कठारिया यांची निवड झाली आहे.
संघटनेच्या पदाधिकारी निवडी नंतर बोलताना डॉ. निलेश थोरात म्हणाले, इंडियन मेडिकल असोशिएशनच्या डॉक्टरांच्या अधिकृत संघटनेच्या वतीने कोरोनाच्या काळात सातारा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्व शासकीय रुग्णालयात आपली सेवा दिली आहे. सोबतच सातारा जिह्यात नव्याने होऊ घातलेल्या मेडिकल कॉलेज करिता देखील सर्व डॉक्टर्स सहकार्य करतील, इंडियन मेडिकल असोशिएशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, तसेच सांगली, कोल्हापुर जिह्यातील पूरग्रस्ताना मदत, तसेच मेडिकल असोशिएशनची बहुउद्देशीय इमारत जिह्यात सर्व कार्यासाठी कार्यरत आहे.
कोरोना काळात अनेक डॉक्टर्सनी आपले दवाखाने हॉस्पिटल कोरोना रुगणांच्याकरिता खुले केले, तसेच त्यांना लस, इंजेक्शन, औषधे उपलब्ध करून दिली. येणाऱया काळात महास्पोर्ट्स च्या माध्यमातून जिह्यातील खेळाडू घड़वीन्यासाठी आम्ही सर्व जण मिळून प्रयत्न करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.