नवी दिल्ली
दुचाकी पूनर्निमिती इंडियन मोटरसायकलने भारतामध्ये आपली नवीन ‘चीफ’ ही मोटरसायकल सादर केली आहे. ज्याची सुरुवातीची किमत 20.75 लाख रुपये असल्याची माहिती आहे.
पोलारिस इंडस्ट्रीजचे पूर्ण हक्क असणाऱया कंपनीने भारतामध्ये ‘2022 चीफ’ अंतर्गत विविध गाडय़ा सादर केल्या आहेत. डार्क हॉर्स, इंडियन चीफ बॉबर डार्क हॉर्स आणि इंडियन सुपर चीफ लिमिटेड या मॉडेलचा यात समावेश आहे. मोटारसायकलीला 1,890 सीसी एअर कूल्ड इंजिन आहे. अँटीलॉक बेकिंग सिस्टीमही याला आहे.