क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
भुवनेश्वरः इंडियन वूमन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील लढतीत एसएसबीविरूद्ध गोल केल्यानंतर जल्लोष करताना गोव्याच्या शिरवडे स्पोर्ट्स क्लबच्या महिला फुटबॉलपटू.
इंडियन वूमन्स लीग फुटबॉल स्पर्धेत अखेर गोव्याच्या शिरवडे स्पोर्ट्स क्लबने विजयाचे तोंड पाहिले. काल भुवनेश्वर येथील सॅव्हेंथ बटालियनच्या मैदानावर झालेल्या सामन्यान शिरवडे स्पोर्ट्स क्लबने एसएसबी वूमन एफसी संघाचा 2-1 पराभव केला.
सामन्याच्या 32व्या मिनिटाला सॅलफिडा नाँगरन व 62व्या मिनिटाला अर्पिता पेडणेकरने शिरवडे स्पोर्ट्स क्लबसाठी गोल केले. एसएसबी वूमन एफसी संघाचा एकमेव गोल संध्याने 60व्या मिनिटाला केला. या विजयाने शिरवडेला 3 गुण प्राप्त झाले. त्यांचे 7 सामन्यांतून एक विजय, एक बरोबरीने 4 गुण झाले. एसएसबी वूमन एफसी संघाचे सात सामन्यांतून 9 गुण झाले आहेत.