प्रतिनिधी / कोल्हापूर
सहकार क्षेत्रातील देशपातळीवर नावलौकिकप्राप्त संस्था ‘इंडियन सोसायटी फॉर स्टडीज इन को-ऑपरेशन’ या संस्थेच्या प्रशासकीय समिती सदस्यपदी प्रा. डॉ. रूपा शहा यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. पाच वर्षांसाठी मार्च 2025 पर्यंतच्या कालावधीसाठी ही निवड करण्यात आली आहे.
नव्या प्रशासकीय समितीची घोषणा नुकतीच झाली. अहमदाबाद येथील गुजरात स्टेट को-ऑपरेटिव्ह युनियनचे जी. एच. अमिन यांची चेअरमनपदी, डॉ. ए. पी. कन्सल तसेच नवी दिल्ली येथील प्रा. एस. के. केजरीवाल यांची व्हाईस चेअरमनपदी, तर पुणे येथील प्रा. अनिल कारंजकर यांची सेक्रेटरीपदी निवड झाली आहे. टी. स्वप्ना चंदर हे खजानीसपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत, तर प्रशासकीय समितीच्या अन्य सदस्यांमध्ये डॉ. मनिषा पालीवाल (मुंबई), डॉ. व्ही. बी. जुगळे (सांगली), डॉ. मुकुंदराव तापकीर (एसपीपीयू , पुणे), प्रा. डॉ. रूपा शहा (कोल्हापूर), डॉ. टी. परंज्योती (त्रिवेंद्रम, केरळ), ऍड. सुभाष मोहिते (पुणे), डॉ. संजीव खडके (पुणे), डॉ. सी. पिचाई (गांधीग्राम, तामिळनाडू), डॉ. देब प्रिया (हैद्राबाद) व आनंद यादव (लेखापरिक्षक, पुणे) यांचा समावेश आहे.
‘इंडियन सोसायटी फॉर स्टडीज इन को-ऑपरेशन’ या संस्थेतर्फे दरवर्षी देशातील विविध ठिकाणी सहकारविषयक अभ्यास परिषदांचे आयोजन करण्यात येते. या परिषदांमध्ये सहकार चळवळ व सहकार क्षेत्रासमोरच्या नवनव्या आव्हानांसंदर्भात देशभरातील अभ्यासक आपले संशोधनपर निबंध सादर करत असतात. प्रा. डॉ. शहा यांनीही अशा परिषदांमध्ये वेळोवेळी आपले शोधनिबंध सादर केलेले आहेत.