वृत्तसंस्था/ कोलकाता
इंडिया अ संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर जाणार असून या दौऱयात चार दिवसांचे तीन कसोटी सामने खेळविले जाणार आहेत. इंडिया अ संघामध्ये वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि यष्टीरक्षक व फलंदाज ईशान किशन यांचा समावेश आहे. चहर आणि किशन हे इंडिया अ संघात लवकरच दाखल होतील.
न्युझीलंड आणि भारत यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना येथील इडन गार्डन्स मैदानावर रविवारी खेळविला जात आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाबरोबर दीपक आणि इशान यांचे कोलकात्यात आगमन झाले. 23 नोव्हेंबरला भारत अ संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. दक्षिण आफ्रिकन दौऱयातील पहिल्या कसोटीला 26 नोव्हेंबरपासून प्रारंभ होईल. या कसोटी मालिकेतील सर्व सामने ब्लोमफाऊंटन येथे खेळविले जातील.