ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजींच्या पुतळय़ाचे छायाचित्र ट्विट करून ही माहिती दिली आहे.
देशाच्या इतिहासात वीर जवांनांनी दिलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ दिल्लीच्या इंडिया गेट परिसरात असणारी अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीन होणार आहे. त्यामुळे विरोधकांडून टीका होत असतानाच मोदींनी नेताजींचा पुतळा उभारण्याची घोषणा केली.
येत्या 23 जानेवारी देश नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करत आहे. या जयंतीनिमित्त होलोग्राम पुतळय़ाचे अनावरण करण्यात येणार असून, त्यांच्या कार्याप्रती हा एक सन्मान ठरेल, असे मोदींनी म्हटले आहे.