मुंबई :
सध्या बाजारामध्ये गुंतवणूदारांना आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी निर्माण होत आहे. यामध्ये विविध कंपन्यांचे आयपीओ हे लॉकडाऊनपासून भांडवली बाजारात येत आहेत. सध्या इंडिया पेन्ट्स कंपनीच्या एक हजार कोटी रुपयांच्या आयपीओला बाजार नियामक सेबी यांच्याकडून मंजुरी मिळालेली आहे.
पेंटची निर्मिती करणाऱया इंडिया पेन्ट्समध्ये सिकोइया कॅपिटलची मोठी हिस्सेदारी आहे. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या नुसार कंपनी 300 कोटी रुपयांचे पेश समभाग सादर करणार आहे. यामधून सवलतही देणार असल्याचे संकेत आहेत. कंपनीने मागील वर्षातील नोव्हेंबरमध्ये सदरच्या आयपीओसाठी सेबीकडे मंजुरीसाठी प्रस्ताव दाखल केला होता. अखेर मंजुरी प्राप्त झाली आहे.