मुंबई
उत्तर प्रदेश राज्यातील खत उद्योगातील कंपनी इंडिया पेस्टिसाइडचा आयपीओ भारतीय भांडवली बाजारामध्ये येत्या 23 जूनला दाखल केला जाणार असल्याचे समजते. सदरच्या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 500 कोटी रुपये उभारणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. सदरचा आयपीओ भारतीय शेअर बाजारामध्ये 23 जूनला खुला होणार असून 25 जूनला बंद होणार आहे. या दरम्यानच्या काळामध्ये गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी प्राप्त होणार असल्याचे समजते. कंपनी आयपीओअंतर्गत 100 कोटी रुपयांचे ताजे समभाग सादर करणार आहे.